Sakal Media News
banner
sakalmedia.bsky.social
Sakal Media News
@sakalmedia.bsky.social
जळगावमधील केमिकल फॅक्टरीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.

#jalgaon #chemicalfactoryfire #jalgaonfire #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
November 15, 2025 at 4:45 AM
अभिनेता राजकुमार रावच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. राजकुमार आणि पत्रलेखा आई-वडील बनले आहेत. विशेष म्हणजे, या दौघांना त्यांच्या लग्नाच्या चौथ्या ॲनिव्हर्सरीला आई-बाबा बनण्याचं भाग्य लाभलं आहे. याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे.

#rajkummarrao #patralekha #rajkummarraobecomesdad #dad #mom #daughter #entertainmentnews
November 15, 2025 at 3:47 AM
कर्नाटकमध्ये बिबट्याने सफारी बसवर झडप टाकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्याने झडप टाकल्यानंतर बसमधील 50 वर्षीय महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. चेन्नईच्या या महिलेला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले असून ती ठीक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नॉन-एसी बस सफारी थांबवण्यात आली आहे.

#leopardattack #leopard #leopardviralvideo #leopardsafaribusattack #karnataka #viralvideo
November 13, 2025 at 3:49 PM
पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7-8 जणांचा मृत्यू झाला आहे. अशात या अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक कार बसखाली घुसल्याचे दिसत आहे. या अपघातात 20-25 गाड्या एकमेकांना धडकल्याचे सांगितले जात आहे.

#pune #navalebridgeaccident #containeraccident #puneaccident #latestupdates #latestnews #marathinews
November 13, 2025 at 2:46 PM
IPL 2026 पूर्वी KKR ने CSK च्या जुन्या पठ्ठ्याला आपल्या ताफ्यात सामील केलं आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#ipl2026 #shanewatson #kkr #csk #cricketupdates #assistantcoach #sakalnews #latestupdates #latestnews #marathinews
November 13, 2025 at 2:06 PM
सत्तरी ओलांडलेल्या उद्योजिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्यासोबत बायोकॉनच्या संस्थापिका किरण मजूमदार शॉ दिसत आहेत. मजूमदार यांचा भाचा एरिक मजूमदार यांच्या विवाह सोहळ्यातला हा क्षण आहे. एरिक हे किरणचे भाऊ रवी मुजूमदार यांचा पुत्र आहेत. नेते आणि उद्योजक अनिल शेट्टी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे

#sudhamurthydancevideo #sudhamurthy
November 13, 2025 at 12:37 PM
अंजली दमानियांची मागणी तुम्हाला पटते का?

#AnjaliDamania #AjitPawar #DCMAjitPawar #resignationdemand #MaharashtraPolitics #Poll #Politics #latestupdates #latestnews #marathinews
November 12, 2025 at 12:02 PM
जयपूरमध्ये एका डंपरचा मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर) विचित्र अपघात झाला. कचरा घेऊन जाणारा हा डंपर एलिव्हेटेड रोडखालून जाताना ओव्हरब्रिजला धडकला. या अपघातानंतर डंपरचा पुढील भाग जवळपास 15 फूट वर उचलला गेला आणि केबिन हवेत लटकलं. यावेळी ड्रायव्हरने परिस्थिती लक्षात घेता वेळीच केबिनमधून उडी मारत जीव वाचवला. आता या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

#jaipurdumperaccident #dumperviralvideo #jaipurdumper
November 12, 2025 at 11:06 AM
चालकांनो सावधान! ⚠️

सोशल मीडियावर तमिळनाडूतील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एका धावत्या कारच्या आरश्यातून अचानक साप निघाला आहे. या घटनेमुळे आता वाहन चालकांना गाडी घेऊन बाहेर पडण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

#tamilnadu #snakeviralvideo #carmirrorsnake #viralvideo #viral #latestupdates #latestnews #marathinews
November 11, 2025 at 1:55 PM
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (दि. 10 नोव्हेंबर) सायंकाळी झालेल्या स्फोटाप्रकरणी डॉ. मुझम्मिलला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली. ही अटक दहशतवादी कारवायांच्या आरोपाखील करण्यात आली आहे. अशात या अटकेनंतर मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर) मुझम्मिलची आई नसीमा यांनी वृत्तसंस्था ANI शी बोलताना दोन्ही मुलांना सोडून देण्याची मागणी केली.

#delhiblast #redfort #crimenews #sakalnews #drmuzzammil #naseema
November 11, 2025 at 9:44 AM
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या स्फोटाची बातमी खूपच दु:खद आणि चिंताजनक आहे, असं म्हटलं आहे.

#RahulGandhi #redfortblast #delhi #blast #breakingnews #latestupdates #latestnews #marathinews
November 10, 2025 at 4:48 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी, स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केलं आहे.

#pmmodi #narendramodi #amitshah #redfortblast #delhi #blast #breakingnews #latestupdates #latestnews #marathinews
November 10, 2025 at 4:33 PM
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

सविस्तर वाचा:
www.esakal.com/premier/dhar...

#dharmendra #actor #dharmendraonventilator #ventilator #breachcandyhospital #latestupdates #latestnews #marathinews
November 10, 2025 at 11:26 AM
फिलिपाईन्समध्ये फंग-वोंग चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राच्या भल्यामोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

#TyphoonFungWong #PhilippinesStorm #CycloneAlert #FungWong #NaturalDisaster #ViralVideo #SeaWaves #NatureFury #TyphoonUpdate
November 10, 2025 at 10:01 AM
पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये विचित्र अपघात झाला आहे. BRT मधून जाताना दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यानंतर त्याचं डोकं BRT बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकल्याचं व्हिडिओत दिसत आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

#BikerAccident #Wakad #BRT #puneaccident #punenews #PCMC #viralvideo #pimprichinchwad #latestupdates #latestnews #marathinews
November 8, 2025 at 7:01 AM
दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापुरात येणाऱ्यांचं स्वागत करणारी 'स्वर्ग कमान' पाडली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

#kolhapurswargkaman #swargkaman #kolhapur #viralvideo #maharashtranews #latestupdates #latestnews #marathinews
November 7, 2025 at 6:55 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे आणि त्यांना "महान व्यक्तिमत्त्व" आणि ते आपले मित्र असल्याचे म्हटले आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/global/donal...

#us #donaldtrump #narendramodi #donaldtrumpindiavisit #usindiatraderelations #globalnews #latestupdates #latestnews #marathinews
November 7, 2025 at 4:04 AM
वंदे भारत स्लीपर ट्रेनने चाचणीवेळी यशस्वीरीत्या ताशी 180 किमी स्पीड गाठली आहे. ही चाचणी सवाई मधोपूर-कोटा-नागदादरम्यान घेण्यात आली. आता या चाचणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

#VandeBharat #VandeBharatSleeper #IndianRailways #TrainTrial #HighSpeedTrain #180kmph #RailwayUpdate #IndiaOnTrack #ModernIndia #RailwayNews #TrainVibes #MakeInIndia #TravelIndia
November 6, 2025 at 5:03 AM
बिहारमधील निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी भाजप उमेदवार मैथिली ठाकूरने काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं.

#BiharElections2025 #MaithiliThakur #BJP #Alinagar #Darbhanga #KashiVishwanath #Phase1Voting #DemocracyInAction #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
November 6, 2025 at 3:57 AM
हातावर मेहंदी काढल्याने चेंबूर येथील नामांकित शाळेने 15 ते 20 विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/mumbai/chemb...

#mumbai #chembur #school #studentgirls #deniesentryinclassroom #MehndiControversy #classroom #heena #education #EducationDepartment #latestupdates #latestnews #marathinews
November 4, 2025 at 6:46 AM
मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोमवारी (दि. 3 नोव्हेंबर) मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्याबाबत पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या चिमुकल्याबाबत ही पोस्ट आहे. अभिनेत्याने सरकारकडे लवकरात लवकर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याने बिबट्याच्या पायाच्या ताज्या ठश्यांचे फोटोही शेअर केले आहेत.
#hemantdhome #pimparkhed #amolkolhe #leopardattack
November 4, 2025 at 5:37 AM
भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्मृती मानधनाने मोलाचा वाटा उचलला. या विश्वविजयानंतर तिचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा पलाश मुच्छलनेही तिच्यासोबत मैदानावर सेलिब्रेशन केले. यावेळी पलाशने स्मृतीला कडकडून मिठी मारत तिच्या खांद्यावर तिरंगाही टाकला. त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

#SmritiMandhana #PalashMuchhal #womensworldcup2025 #indwvssaw #worldcupfinal #viralvideo
November 3, 2025 at 8:01 AM
नेदरलँड्समध्ये रेल्वे फाटक ओलांडताना अडकलेला ट्रकला ट्रेनने जोरदार धडक दिली. यात 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

#NetherlandsAccident #TrainCrash #ViralVideo #InternationalNews #RailwayCrossing #TruckAccident #EuropeNews #BreakingNews #SocialMediaViral #ShockingVideo
November 1, 2025 at 2:33 PM
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या मुंबईतील मोर्चाबाबत मोठं विधान केलंय.

#chandrakantpatil #bjp #mumbaimorcha #mva #mns #latestupates #latestnews #marathinews
November 1, 2025 at 2:05 PM