Rajendra Ghorpade
banner
rajendraghorpade.bsky.social
Rajendra Ghorpade
@rajendraghorpade.bsky.social
झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण : एक आकलन

झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. “झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरील माझे आकलन मांडताना माझ्या नजरेसमोर, मी 1968-69 दरम्यान वाचलेल्या आनंद यादव यांच्या "गोतावळा" या कादंबरीत…
झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण : एक आकलन
झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. “झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरील माझे आकलन मांडताना माझ्या नजरेसमोर, मी 1968-69 दरम्यान वाचलेल्या आनंद यादव यांच्या "गोतावळा" या कादंबरीत मराठीबरोबरच अगदी दमदारपणे वापरलेल्या ग्रामीण बोलीचा सक्षम वावर तरळून जातो. अगदी तेव्हापासूनच माझ्या मानसपटलावर आमच्या झाडीपट्टीच्या भागात बोलल्या जाणाऱ्या ग्रामीण बोलीचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले. नंतर कधीतरी 1990-91 मध्ये मला कळले की आमच्या या झाडीपट्टीच्या भागातील ग्रामीण बोलीला डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी, झाडीबोली असे अगदी सार्थ नाव दिले आहे. आणि अर्थातच मी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्यासोबत जुळलो तो आजतागायत. अशा आमच्या या झाडीबोली बद्दलचे माझे संक्षिप्त आकलन मी आपणासमोर मांडत आहे.
iyemarathichiyenagari.com
December 26, 2025 at 7:10 PM
महापालिका निवडणुका: नवीन पद्धत आहे तरी काय ?

आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे एका वार्डातून आता एका पेक्षा अधिक म्हणजे चार किंवा पाच नगरसेवक…
महापालिका निवडणुका: नवीन पद्धत आहे तरी काय ?
आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे एका वार्डातून आता एका पेक्षा अधिक म्हणजे चार किंवा पाच नगरसेवक निवडून देण्याची पद्धत. ...काय आहे ही पद्धत अन् त्याचे फायदे लेखन : सुधीर थोरवेसंपादन: देवेंद्र भुजबळ9869484800 निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांमधील निवडणुका नुकत्याच जाहीर केलेल्या आहेत. तीन वर्षाच्या विलंबाने नवीन निवडणुका जाहीर झाल्यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत. आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे.
iyemarathichiyenagari.com
December 26, 2025 at 6:42 AM
“शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” पुस्तकाचे प्रकाशन

"शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" पुस्तकाचे प्रकाशन पुणे - डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. इंगोल्या म्हणाल्या, स्त्री चळवळीला आज…
“शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” पुस्तकाचे प्रकाशन
"शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" पुस्तकाचे प्रकाशन पुणे - डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. इंगोल्या म्हणाल्या, स्त्री चळवळीला आज पन्नास वर्ष पूर्ण होताहेत. याच दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हा पण एक योगायोग आहे. ह्या सुवर्णयोगावर स्त्री वादी चळवळीबद्दल आत्मीयता असणाऱ्या आणि त्यावर आस्थापूर्वक काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे विमोचन संपन्न झाले हा आणखी एक अमृतयोगच म्हणावे लागेल. डॉ. प्रतिमा इंगोले ह्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत. आपल्या या निरीक्षणाचे सर्व कौशल्य पणाला लावून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
iyemarathichiyenagari.com
December 25, 2025 at 6:57 PM
विश्वभारतीचा उत्सव : जगाला जोडणारा ख्रिसमस

आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचा, करुणेचा आणि…
विश्वभारतीचा उत्सव : जगाला जोडणारा ख्रिसमस
आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचा, करुणेचा आणि विश्वबंधुत्वाचा घोष बनतो. म्हणूनच ख्रिसमसकडे पाहताना ‘विश्वभारती’ या व्यापक संकल्पनेच्या चष्म्यातून पाहिले, तर हा दिवस जगभरातील संस्कृती, परंपरा आणि समाज यांना एका अदृश्य धाग्याने जोडताना दिसतो. विश्वभारती म्हणजे केवळ एखादी संस्था किंवा विद्यापीठ नव्हे, तर संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब आहे ही भावना. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमध्ये मांडलेली ही संकल्पना आज ख्रिसमसच्या निमित्ताने जगभर वेगवेगळ्या रूपांत साकार होताना दिसते.
iyemarathichiyenagari.com
December 25, 2025 at 7:26 AM
किडनीला हमी भाव मिळालाच पाहिजे..!

हे सर्व घडत असताना आपल्या आमदार, खासदारांना आणि मंत्र्यांना हे माहीत असते कारण हे काय आभाळातून पडलेले नाहीत हे देखील शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यांची देखील शेती आहे तरी देखील राजकीय शक्तीचा वापर करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी व्यवस्था तयार करण्यामध्ये यांना रस…
किडनीला हमी भाव मिळालाच पाहिजे..!
हे सर्व घडत असताना आपल्या आमदार, खासदारांना आणि मंत्र्यांना हे माहीत असते कारण हे काय आभाळातून पडलेले नाहीत हे देखील शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यांची देखील शेती आहे तरी देखील राजकीय शक्तीचा वापर करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी व्यवस्था तयार करण्यामध्ये यांना रस नाही. शेतीतून बाहेर पडले आणि एकदा मुंबई, दिल्लीला गेले की हे शेतकऱ्यांचे राहत नाहीत. ते प्रशासनाच्या बाजारपेठेतील दलाल होतात आणि या मंत्रालय किंवा सचिवालयांना वेढलेल्या धोरणकर्त्यांचे होऊन जातात. अनेक जणांना याची जाणीव असते. पण संघर्ष करायची कोणाची तयारी नाही. वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक विशेष म्हणजे एका शेतकऱ्याने एक लाख रुपये सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ७४ लाख रुपयाची मागणी होते आणि त्यासाठी तो किडनी विकतो अशी बातमी जेव्हा प्रसार माध्यमात येते तेव्हा महाराष्ट्राला ना खंत वाटली ना कुणाला दुःख झालं.
iyemarathichiyenagari.com
December 25, 2025 at 5:24 AM
मुंबईचे लचके नि मराठी माणूस , पुन्हा ऐरणीवर..

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार…
मुंबईचे लचके नि मराठी माणूस , पुन्हा ऐरणीवर..
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षाचा विस्तार करताना मुंबईचे केंद्राकडून लचके तोडले जातील अशी अनेकदा भिती घातली होती. मराठी माणूस व मराठी अस्मिता हा शिवसेनाचा तर आधार आहे. आता तेच तेच मुद्दे ठाकरे बंधूंना किती लाभदायक ठरतील ? डॉ. सुकृत खांडेकर उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेत उबाठा सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्याचे जाहीर केले.
iyemarathichiyenagari.com
December 25, 2025 at 5:00 AM
WordCamp Kolhapur 2026 साठी मीडिया पार्टनरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, वेब…
WordCamp Kolhapur 2026 साठी मीडिया पार्टनरसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, वेब डेव्हलपमेंट आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्राशी संबंधित माध्यम संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. वर्डकॅम्प ही वर्डप्रेस समुदायाची अधिकृत परिषद असून, येथे वेबसाइट निर्मिती, कंटेंट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सायबर सुरक्षा, ओपन-सोर्स तत्त्वज्ञान आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तंत्रज्ञान, ज्ञानवाटप आणि ओपन-सोर्स संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या महत्त्वाच्या उपक्रमाचा भाग बनण्यासाठी कोल्हापूरसह राज्य व देशभरातील माध्यम संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
iyemarathichiyenagari.com
December 24, 2025 at 6:30 PM
शून्य काय आहे ?

येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करतां येत नाहीं. हें कोण प्रसवतें ? म्हणून पाहूं गेलें तर, त्याचें मूळ तें शून्य आहे. ज्ञानदेव या…
शून्य काय आहे ?
येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करतां येत नाहीं. हें कोण प्रसवतें ? म्हणून पाहूं गेलें तर, त्याचें मूळ तें शून्य आहे. ज्ञानदेव या ओवीतून आपल्याला ज्या सत्याकडे नेतात, ते केवळ तात्त्विक नाही, तर अनुभूतीजन्य आहे. ही ओवी वाचताना प्रथमच जाणवते ती एक विलक्षण उलथापालथ—आपण ज्या “मी”ला घट्ट धरून बसलो आहोत, ज्या अहंभावाभोवती आपले संपूर्ण जीवन, व्यवहार, नाती, आकांक्षा गुंफलेली आहेत, त्याच “मी”चे मूळ शोधायला गेलो तर ते सापडतच नाही.
iyemarathichiyenagari.com
December 24, 2025 at 7:26 AM
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

थोर कवी कुसुमाग्रज यांच्या "कुणी, घर देता का रे घर ?" या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक उमेदवार भिंती वाचूनछपरावाचूनमाणसाच्या मायेवाचूनदेवाच्या दयेपासूनगल्लोगल्ली फिरत आहेजिथून कुणी उठवणार नाहीअशी जागा धुंडत आहेकुणी,…
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?
थोर कवी कुसुमाग्रज यांच्या "कुणी, घर देता का रे घर ?" या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक उमेदवार भिंती वाचूनछपरावाचूनमाणसाच्या मायेवाचूनदेवाच्या दयेपासूनगल्लोगल्ली फिरत आहेजिथून कुणी उठवणार नाहीअशी जागा धुंडत आहेकुणी, तिकीट देता का रे तिकीट ? काय रे बाळाखरंच सांगतो बाबांनोउमेदवार आता थकून गेलायइकडे तिकडे जमेल तसेनोकरी,धंदे करूनअर्ध अधिक तुटून गेलायमिनतवार्‍या करूनहातापाया पडूनघरच्यांची बोलणी खाऊनमित्रांची मस्करी सहन करूनझुंज देऊन देऊनउमेदवार आता थकून गेलायउमेदवाराला आता
iyemarathichiyenagari.com
December 24, 2025 at 6:43 AM
सीमा, भाषा आणि विश्वभारती : संघर्षातून संवादाकडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही दिवसांतच तो ठराव फाईलमध्ये बंद होतो. पुढील संमेलनात पुन्हा तोच ठराव, तीच भाषा, तीच…
सीमा, भाषा आणि विश्वभारती : संघर्षातून संवादाकडे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही दिवसांतच तो ठराव फाईलमध्ये बंद होतो. पुढील संमेलनात पुन्हा तोच ठराव, तीच भाषा, तीच भावना आणि तोच निष्कर्ष कागदावरचा लढा, प्रत्यक्षात मात्र शून्य परिणाम. हा अनुभव नवा नाही. गेली अनेक दशके मराठी भाषकांनी हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो, अशा ठरावांमुळे खरोखर मराठी भाषेचे संवर्धन व विकास होतो का ? की हे ठराव केवळ राजकीय प्रतीकात्मकतेपुरते मर्यादित राहतात ? सीमा प्रश्न : जखम जुनी, वेदना आजही ताजी
iyemarathichiyenagari.com
December 24, 2025 at 6:06 AM
शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम…
शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम कपडे असूनही लोकांना अन्नासाठी शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या सुभाषितवर इये मराठीचिये नगरीचे भाष्य - अन्नदाता शेतकरी : समृद्धीच्या मुळाशी उभा असलेला मूक आधारस्तंभ हे सुभाषित अत्यंत साध्या शब्दांत मानवी संस्कृतीतील एक मूलभूत सत्य मांडते. सोने, चांदी, माणिक, उत्तम वस्त्रे, ऐश्वर्य, सत्ता, वैभव – हे सर्व असूनही अखेरीस माणसाला अन्नासाठी शेतकऱ्याच्या दारात यावेच लागते. कारण अन्नाशिवाय जीवन नाही, आणि अन्नाचा उगम शेतकऱ्याच्या कष्टांतूनच होतो.
iyemarathichiyenagari.com
December 24, 2025 at 4:55 AM
रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

मुंबई कॉलिंग - भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही…
रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…
मुंबई कॉलिंग - भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही घटना भाजप व देवाभाऊंना मोठी अवमान करणारी होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेत बंडाच्या नावाखाली मोठी तोडफोड झाली. डॉ. सुकृत खांडेकर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मिरा- भायंदर, वसई –विरार, उल्हासनगर, भिवंडी – निजामपूर, पनवेल, पुणे, पिंपरी – चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, सांगली- मिरज, कोल्हापूर, परभणी, नांदेडसह राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
iyemarathichiyenagari.com
December 23, 2025 at 7:01 PM
भारत आणि न्यूझीलंड यांची ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक…
भारत आणि न्यूझीलंड यांची ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक सहभागाचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. हा करार ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असून, भारताने अत्यंत वेगाने वाटाघाटी पूर्णत्वास नेऊन केलेल्या मुक्त व्यापार करारांपैकी एक आहे. या वाटाघाटींची औपचारिक सुरुवात 16 मार्च 2025 रोजी वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्-क्ले यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत झाली. वाटाघाटीच्या पाच औपचारिक फेऱ्या, अनेक प्रत्यक्ष भेटीगाठी आणि दूरदृश्य माध्यमातून आंतरसत्रीय बैठका यांद्वारे सातत्यपूर्ण व सखोल चर्चा करून या कराराचे अंतिम स्वरूप निश्चत करण्यात आले.
iyemarathichiyenagari.com
December 23, 2025 at 6:10 PM
विश्वभारती चळवळः मॅन्ग्रोव्ह वनराई – किनाऱ्यांची ढाल, हवामानाची तिजोरी आणि जीवनाचा आधार

समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती नसून ती संपूर्ण किनारी परिसंस्थेची रक्षणकर्ती…
विश्वभारती चळवळः मॅन्ग्रोव्ह वनराई – किनाऱ्यांची ढाल, हवामानाची तिजोरी आणि जीवनाचा आधार
समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती नसून ती संपूर्ण किनारी परिसंस्थेची रक्षणकर्ती आहेत. वादळे, चक्रीवादळे, समुद्राची धूप, हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, मासेमारीचे भवितव्य आणि लाखो लोकांची उपजीविका या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मॅन्ग्रोव्हमध्ये दडलेली आहेत. म्हणूनच आज जगभरात मॅन्ग्रोव्ह संवर्धन आणि पुनर्स्थापना ही केवळ पर्यावरणीय गरज न राहता मानवी अस्तित्वाची अपरिहार्यता बनली आहे. जागतिक पातळीवर या कार्यात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या World Wide Fund for Nature (WWF) संस्थेने गेल्या चार वर्षांत २४ लाख एकरांहून अधिक मॅन्ग्रोव्ह क्षेत्राचे संरक्षण आणि पुनर्स्थापन केले आहे.
iyemarathichiyenagari.com
December 23, 2025 at 7:09 AM
लेखकांने लिखाणाबरोबर कृतिशील असावे : सायमन मार्टिन

इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या पलीकडे जाऊन जो भूमिका घेऊन लिहितो तोच खरा लेखक असतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध…
लेखकांने लिखाणाबरोबर कृतिशील असावे : सायमन मार्टिन
इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या पलीकडे जाऊन जो भूमिका घेऊन लिहितो तोच खरा लेखक असतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी सायमन मार्टिन (वसई ) यांनी केले. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने कै. सुभद्रादेवी माने सभागृहात आयोजित पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक शामसुंदर मर्दा, उद्योजक मदन कारंडे, काकासो माने मेमोरियल ट्रस्टचे सचिव शिवाजी जगताप, कवी संमेलनाध्यक्ष चंद्रकांत पोतदार, कवी अजय कांडर, मधुकर मातोंडकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
iyemarathichiyenagari.com
December 23, 2025 at 6:36 AM
अध्यात्म म्हणजे काय ?

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीनें असणाऱ्या ब्रह्माचें जें अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हें नाव आहे. ज्ञानदेव महाराज अर्जुनाशी बोलताना…
अध्यात्म म्हणजे काय ?
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीनें असणाऱ्या ब्रह्माचें जें अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हें नाव आहे. ज्ञानदेव महाराज अर्जुनाशी बोलताना इथे “अध्यात्म” या शब्दाचा अत्यंत सूक्ष्म, पण सर्वव्यापी अर्थ उलगडतात. सामान्यपणे अध्यात्म म्हटले की लोकांच्या मनात जप, तप, ध्यान, उपासना, संन्यास, एकांत, देहत्याग अशा संकल्पना उभ्या राहतात. पण ज्ञानदेवांना अपेक्षित असलेले अध्यात्म या सर्वांच्या पलीकडचे आहे. अध्यात्म म्हणजे काही कृतींचा संच नाही, काही बाह्य शिस्तींची यादी नाही; अध्यात्म म्हणजे आपल्या अस्तित्वाची सहज, स्वाभाविक, अखंड अवस्था.
iyemarathichiyenagari.com
December 23, 2025 at 6:10 AM
विश्वभारती चळवळः रिओ ग्रांडे जीवनवाहिनीचा पुनर्जन्म — निसर्ग, मानव आणि सहअस्तित्वाची कथा

पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल हा परस्पर संबंध WWF च्या कामाचा आत्मा आहे. नदी वाचवणे…
विश्वभारती चळवळः रिओ ग्रांडे जीवनवाहिनीचा पुनर्जन्म — निसर्ग, मानव आणि सहअस्तित्वाची कथा
पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल हा परस्पर संबंध WWF च्या कामाचा आत्मा आहे. नदी वाचवणे म्हणजे निसर्ग वाचवणे, आणि निसर्ग वाचवणे म्हणजे माणसाचे भविष्य सुरक्षित करणे. रिओ ग्रांडेची ही कथा केवळ अमेरिका आणि मेक्सिकोपुरती मर्यादित नाही, ती जगभरातील प्रत्येक नदीसाठी, प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य भागातून वाहणारी रिओ ग्रांडे नदी ही केवळ भौगोलिक सीमारेषा नाही, तर ती लाखो लोकांच्या जीवनाचा, संस्कृतीचा आणि जैवविविधतेचा आधार आहे.
iyemarathichiyenagari.com
December 22, 2025 at 6:21 PM
नाताळातही थंडी, पण नववर्ष सलामीला थंडी होणार कमी

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान…
नाताळातही थंडी, पण नववर्ष सलामीला थंडी होणार कमी
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. जवळपास सलग महिनाभर थंडीची अनुभूती- तीस नोव्हेंबर पासुन ते १९ डिसेंबर( वेळ आमावस्या)पर्यंतच्या २० दिवसात महाराष्ट्रात जाणवलेली थंडी अजुन तशीच पुढे ९ दिवस म्हणजे रविवार ( दि. २८ डिसेंबर ) पर्यन्त जाणवू शकते. उत्तरेतील ही थंडी सध्या महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. नाताळ सणादरम्यानच्या ह्या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटांची शक्यताही नाकारता येत नाही.
iyemarathichiyenagari.com
December 22, 2025 at 1:13 PM
जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….

बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या…
जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….
बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या धैर्याला आणि परंपरेला होता… वसुंधरा काशीकर वर्ष १९८५. घटस्फोटित मुस्लिम महिलांना पोटगी किंवा खावटी मिळावी म्हणून शाहबानो नावाची मुस्लिम स्त्री न्यायासाठी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावते. सुप्रीम कोर्ट शाहबानोच्या बाजूनं निकाल देतं. पण मतपेटीच्या राजकारणात हा ऐतिहासिक निकाल फिरवला जातो. संसदेत असलेल्या आपल्या तीन-चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमताने (पंतप्रधान राजीव गांधी तेव्हा ४०५ जागा घेऊन निवडून आले होते.) थेट सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलवला जातो.
iyemarathichiyenagari.com
December 22, 2025 at 9:59 AM
परब्रह्म म्हणजे काय ?

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हालवलें तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. खूप सूक्ष्म, अत्यंत नितळ आणि गूढ असा…
परब्रह्म म्हणजे काय ?
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हालवलें तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. खूप सूक्ष्म, अत्यंत नितळ आणि गूढ असा हा ज्ञानेश्वरीतील विचार आहे. संत ज्ञानदेव महाराज परब्रह्माचे स्वरूप सांगताना येथे अशी प्रतिमा वापरतात की ती केवळ बुद्धीला नव्हे, तर अंतःकरणालाही थरथरवून सोडते. “जें ऐसेंही परि विरुळें ।इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे ।ते परब्रह्म ।।” ही ओवी ऐकताना प्रथमदर्शनी एक विरोधाभास जाणवतो.
iyemarathichiyenagari.com
December 22, 2025 at 6:14 AM
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अग्रगणण्यच !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांक मिळवणारे प्रगतिशील राज्य ठरले असून विविध निकषांवर अन्य…
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अग्रगणण्यच !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांक मिळवणारे प्रगतिशील राज्य ठरले असून विविध निकषांवर अन्य राज्यांच्या तुलनात महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली आहे. या अहवालाचा घेतलेला धांडोळा... प्रा नंदकुमार काकिर्डे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच "हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स " अहवाल प्रसिद्ध केला असून विविध निकषांवरील आकडेवारीच्या माध्यमातून विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केलेले आहे. यामध्ये प्रत्येक राज्याची आर्थिक कामगिरी, दरडोई उत्पन्न, पायाभूत सुविधांची स्थिती यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी सर्वात अव्वल असून त्यांनी ढोबळ राज्य सकल उत्पन्न सर्वाधिक म्हणजे 45.3 लाख कोटी रुपये नोंदवलेले आहे.
iyemarathichiyenagari.com
December 21, 2025 at 7:07 PM
केर‌ळमध्ये कम्युनिस्टांना इशारा घंटा

स्टेटलाइन - भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर रणनिती बनवली आहे. केरळमधे भाजपची ताकद जशी वाढेल तसा डाव्या आघाडीचा संकोच होत जाईल. डॉ. सुकृत…
केर‌ळमध्ये कम्युनिस्टांना इशारा घंटा
स्टेटलाइन - भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर रणनिती बनवली आहे. केरळमधे भाजपची ताकद जशी वाढेल तसा डाव्या आघाडीचा संकोच होत जाईल. डॉ. सुकृत खांडेकर केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला जरब फटका बसला, काँग्रेस प्रणित आघाडीची सरशी झाली तर भाजपने राज्याची राजधानी असलेल्या तिरूअनंपुरमवर आपला भगवा फडकवला. तिरूअनंतपुरमच्या निवडणुकीत १०१ पैकी ५० जागा भाजपने जिंकल्या, काँग्रेस प्रणित युडीएफला २९ तर मार्क्सवादी प्रणित एलडीएफला केवळ १९ जागा हाताला लागल्या.
iyemarathichiyenagari.com
December 21, 2025 at 6:27 AM
आम्ही मराठी...आम्ही भारतीय...आम्ही कोल्हापुरी...
जय हो...
iyemarathichiyenagari.com
Home · इये मराठीचिये नगरी
‘इये मराठीचिये नगरी’ हा समृद्ध मराठी साहित्य, संस्कृती, समाज व चिंतन यांवर आधारित लेखांचा विचारप्रवर्तक ब्लॉग आहे.
iyemarathichiyenagari.com
December 21, 2025 at 5:51 AM